Search

Friday, February 22, 2019

प्रस्तावना

संग्रहालये ही केवळ वस्तू ठेवायची ठिकाणे नाहीत तर ती ज्ञानप्राप्तीची केंद्रे असतात. तिथल्या वस्तूंना विशिष्ट संदर्भ असतात. आपल्याला इतिहासाशी तसंच वेगवेगळ्या विषयांशी जोडून घेणारा तो एक महत्त्वाचा दुवा आहे, याचं भान आपण सतत बाळगणं आवश्यक आहे.
ग्रीक आणि रोमन पुराणकथांनुसार कला, विज्ञान, साहित्य यांच्या नऊ अधिष्ठात्री देवता मानल्या गेल्या आहेत. त्यांना ‘म्युझेस’ असे म्हटले जाते. त्यांच्यावरूनच ‘म्युझिअम’ हा शब्द रूढ झाला आहे. कला, विज्ञान, इतिहास, मानवी संस्कृती यांच्याशी निगडित महत्त्वाच्या वस्तूंचे जिथे जतन आणि प्रदर्शन केले जाते त्या जागेला आपण वस्तुसंग्रहालय म्हणतो. मात्र ही संग्रहालये कशी पाहावी, त्यासाठी सुजाण प्रेक्षक कसे व्हावे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
 संग्रहालयात जाणारा प्रेक्षक हा वेगवेगळ्या हेतूंनी तिथे जातो. काही लोक पाहुण्यांसोबत फिरायला, मुलांना दाखवण्यासाठी तर काही अभ्यासक विशिष्ट वस्तू पाहण्यासाठी, तिचा अभ्यास करण्यासाठी येतात. उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी अलासांद्रा (ं’ं२ंल्ल१िं) नावाचे एक इटालियन अभ्यासक डोसो डोसी या इटालियन चित्रकाराच्या एका चित्राचा अभ्यास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात आले होते. साधारणत: तीन दिवस त्या चित्राचा अभ्यास करण्यासाठी ते थांबले होते. सामान्य प्रेक्षक किंवा अभ्यासक हे त्यांच्या गरजेप्रमाणे, हेतूनुसार संग्रहालयात येतात आणि त्यानुसार ते पाहतात. अभ्यासकांचा हेतू अर्थात स्पष्ट असतो. मात्र सामान्य प्रेक्षकाने संग्रहालय पाहण्यापूर्वी आपल्याला किती वेळ आहे, उपलब्ध वेळेत नेमके काय आणि किती पाहता येईल, याचा विचार करावा.

संग्रहालयात केलेली वस्तूंची मांडणी ही विशिष्ट हेतूने आणि ठरावीक पद्धतीने केली जाते. ते वर्गीकृत प्रदर्शन असते. उदाहरणार्थ निसर्ग-इतिहास दालनात पक्ष्यांचे शास्त्रीय पद्धतीने केलेले वर्गीकरण आणि त्याचे प्रदर्शन. त्यानंतर एक प्रकार म्हणजे सिस्टमॅटिक डिस्प्ले. उदाहरणार्थ कला दालनात केलेली १४ ते २० या शतकांतील लघुचित्रांची मांडणी. तिसरा प्रकार ‘डायोरामा.’ पक्ष्यांच्या संदर्भात बोलायचे झाले तर समजा त्यांचा प्रजननकाळ दाखवायचा आहे तर त्यासाठी चित्रे, आकृत्या, आभासी प्रतिमा यांच्या साहाय्याने तो सुस्पष्ट दाखवता येतो. मात्र तेच पक्षी उडतात कसे, त्यांच्या उडण्याच्या तंत्रातील बारकावे, वेगवेगळ्या पक्ष्यांचे सांगाडे कसे दिसतात, त्यांच्या दातांची रचना कशी आहे हे ‘थिमॅटिक’ प्रदर्शनातून सांगितले जाते. आणखी एक प्रकार असतो तो विशिष्ट कलाकृतीपुरता किंवा वस्तूपुरता मर्यादित असतो. उदाहरणार्थ शिवाजीकालीन होन किंवा पूजा, धार्मिक कार्यातील भांडी यांचे प्रदर्शन. ते साहित्य किंवा विशिष्ट वस्तू पाहताना तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक संदर्भ समोर येतात. समजा आपण एखादी शिवकालीन तलवार पाहात आहोत तर ती पाहताना केवळ एक शस्त्र किंवा ऐतिहासिक वस्तू म्हणून न पाहता त्या तलवारीची निर्मिती कशी झाली असेल, तिची लांबी, रुंदी, उंची काय असेल, तिचे वजन ठरावीकच का असेल त्यावरून तलवार परजणाऱ्या योद्धय़ाचे शारीरिक बळ किती असेल आणि तसे बळ मिळवण्यासाठी त्याचा काही विशिष्ट आहार होता का, हे सगळे संदर्भ त्याच्या जोडीने येतात आणि मग त्या वस्तूला एक अनोखे मूल्य प्राप्त होते. काही वस्तू या फक्त दृश्यात्मक सौंदर्य लक्षात घेऊन मांडल्या जातात. उदाहरणार्थ पोर्सलिीनची वेगवेगळ्या आकाराची, उंचीची विशिष्ट रचनेत मांडलेली अनेक भांडी.

संग्रहालये ही ज्ञानप्राप्तीची केंद्रे आहेत. आपल्याला संस्कृती, इतिहास यांचे आकलन होण्यासाठी, त्यांचे नेमके भान येण्यासाठी आणि आपल्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी त्यांचे महत्त्व अबाधित आहे.

राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली (नॅशनल म्युझियम, न्यू दिल्ली)





भारतातलं सर्वांत मोठं संग्रहालय म्हणून नवी दिल्लीच्या राजपथावर मोठ्या ऐटीत उभं असलेलं राष्ट्रीय संग्रहालय सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. या संग्रहालयात अगदी पुरातन काळापासून ते आजच्या मॉडर्न काळातल्या वस्तू पाहायला मिळतात. या संग्रहालयात आपल्याला पुढील विभागांची माहिती मिळते, जसं पुरातत्व, मानवशास्त्र, डेकोरेटिव्ह आर्ट्स, आंथ्रपोलॉजी, शस्त्रास्त्र, फाइन आर्ट, जुन्या काळातले दागिने, नाणी आणि पदके, प्री कोलंबियन आणि पाश्चात्य कला, वेगवेगळी हस्तलिखितं. पुरातन वस्तूंचं भांडार असलेल्या या संग्रहालयाला वेळ काढून एक तरी भेट द्यायलाच हवी.
Image



भारताच्या केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत, दिल्लीच्या १० जनपथ मार्गावर असलेले राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली (नॅशनल म्युझियम न्यू् दिल्ली) हे देशातील सर्वोत्कृष्ट संग्रहालयांपैकी एक आहे.
राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली साठी इमेज परिणाम
१९४९ मध्ये दिल्लीत स्थापित झालेल्या या संग्रहालयात अनेकविध वस्तूंचे प्रदर्शन पाहायला मिळते. ऐतिहासिक काळापासून आजच्या आधुनिक काळापर्यंत सर्व बाबींशी संलग्नित असलेल्या वस्तूंचे हे एक भव्य संग्रहालय समजले जाते. आजघडीला या संग्रहालयात भारतीय आणि विदेशी अशा एकत्रित जवळपास दोन लाख वस्तू संग्रहित आहेत.





Sunday, February 17, 2019

प्रस्तावना


 

आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी, डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व म्हणजेच पर्यावरण. पण आपल्या आयुष्यात पर्यावरणाचे एवढे महत्व का आहे? कारण माणसाने कितीही प्रगती केली तरी कितीही उच्च झाला तरी आपण सर्व सुद्धा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत. आपण असा भाग आहोत जो पर्यावरणाची रक्षा सुद्धा करण्यास समर्थ आहोत आणि नष्ट करण्यास सुद्धा. पण दुर्दैवाची गोष्ट हि आहे कि, आपल्यातील बरेच जण पर्यावरणाची रक्षा करण्यापेक्षा कळत नकळत हानीच करत असतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा कि आपणही याच पर्यावरणाचा एक भाग आहोत व पर्यावरणासोबतच आपण हळूहळू नकळत आपलाही विनाश करत आहोत.

आपण पृथ्वीवरच का राहतो? इतर ग्रहांवर का नाही? याचे कारण आहे कि आपल्या सौरमालेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच राहण्यायोग्य पर्यावरण आहे. सौरमाला काय आपल्या आजूबाजूच्या, आपल्या माहितीतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच असे पर्यावरण आहे. कित्येक वर्षे, अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत पण कोणीही आजतागायत असा ग्रह शोधू शकले नाही कि ज्यावर माणूस वस्ती करू शकतो. खोलवर विचार करून बघा; आपल्याला एखादे घर नाही आवडले, किंवा तिथे काही प्रोब्लेम्स असतील जसे कि पाणी पुरवठा होत नाही, वीज नाही तर आपण दुसरे घर घेऊ शकतो पण आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने संपली किंवा दुषित झाली तर आपण दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकतो का? नाही ना. म्हणूनच आपल्याला आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. इथल्या पर्यावरणाला जपले पाहिजे. नाहीतर आपला पुढच्या पिढीसाठी आपण खूप मोठी संकटे निर्माण करून ठेऊ ज्यासाठी ती पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.

ऋणनिर्देश

प्रदूषण हा पर्यावरणासाठी खूप मोठा धोका आहे व हे प्रदूषण फक्त मानवच करतो आणि मोठ्या प्रमाणावर करतो. प्रदूषणाचे परिणाम माहित असूनही प्रदूषण कमी करण्यासाठी आपण कोणतेच ठोस पाउल उचलत नाही. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्यासाठी कारखाने वाढत चालले आहेत. हे कारखाने हवेत अनेक प्रकारचे अनैसर्गिक वायू सोडतात ज्यामुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषण वाढत चालले आहे. आपण जर गच्चीवर उभे राहून दूरवर नजर टाकली तर आपणास लांबच्या इमारती किंवा टेकड्या खूप धूसर दिसतात, पण जर एखाद्या गावाला जाऊन दूरवर पाहिल्यास दूरचे डोंगरही स्पष्ट दिसतात. यावरून आपणास समजू शकते कि शहरात किती मोठ्या प्रमाणवर वायू प्रदूषण आहे. कारखाने फक्त वायू प्रदूषणच करतात असे नाही तर ते जलप्रदूषण हि खूप मोठ्या प्रमाणावर करतात, त्याचमुळे शहरातील नद्या, खाड्या किनारे यामधील पाणी नितळ न दिसता काळे दिसते. प्रदूषण फक्त कारखानेच नाही करत तर सामान्य माणसेही प्रदूषण करण्यात मागे नाहीत. आजकाल बऱ्याच लोकांच्या कडे गाड्या असतात. काही जणांकडे एकापेक्षा जास्त गाड्या असतात. छोट्या छोट्या अंतरावर जाण्यासाठी गाड्या वापरल्या जातात. गाड्यांच्या अतिरिक्त वापरामुळे पेट्रोल, डीझेल सारखी मौल्यवान संसाधने तर संपतातच पण प्रदूषण सुद्धा होते.
पर्यावरणाला वाचविण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. कारण आपण पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहोत. सर्वात सोपा उपाय म्हणजे वृक्षतोड थांबविणे व जास्तीत जास्त झाडे लावणे. झाडे लावल्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल व पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईल. शहरांमध्ये सुद्धा झाडे लावण्यासाठी जागा ठेवली गेली पाहिजे व शाळांच्या मदतीने तिथे झाडे लावून विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे; यामुळे येणारी पिढी पर्यावरणाबाबत जागरूक राहील. तसेच वाहनांमुळे होणारे प्रदूषण सुद्धा कमी करण्यावर भर दिला पाहिजे. थोड्याच अंतरावर जायचे असेल तर पायी चालत जावे किंवा सायकलचा वापर करावा. शक्य तेथे बस व रेल्वेच्या वापरावर भर द्यावा ज्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. कारखान्यांवर सुद्धा प्रदूषणसंबधी कारवाई केली गेली पाहिजे आणि योग्य पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले गेले पाहिजेत. जेव्हा पृथ्वीवरील सर्व देश, या देशातील सर्व लोक पर्यावरणाबाबत जागरूक होतील तेव्हाच आपली पृथ्वी पुन्हा एकदा सुजलाम, सुफलाम होईल.