आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व गोष्टी जसे कि झाडे, प्राणी, पशु, पक्षी,
डोंगर, नद्या, वारा, भूमी ह्या सर्व म्हणजेच पर्यावरण. पण आपल्या आयुष्यात
पर्यावरणाचे एवढे महत्व का आहे? कारण माणसाने कितीही प्रगती केली तरी
कितीही उच्च झाला तरी आपण सर्व सुद्धा या पर्यावरणाचाच एक भाग आहोत. आपण
असा भाग आहोत जो पर्यावरणाची रक्षा सुद्धा करण्यास समर्थ आहोत आणि नष्ट
करण्यास सुद्धा. पण दुर्दैवाची गोष्ट हि आहे कि, आपल्यातील बरेच जण
पर्यावरणाची रक्षा करण्यापेक्षा कळत नकळत हानीच करत असतात. पण एक गोष्ट
लक्षात ठेवा कि आपणही याच पर्यावरणाचा एक भाग आहोत व पर्यावरणासोबतच आपण
हळूहळू नकळत आपलाही विनाश करत आहोत.
आपण पृथ्वीवरच का राहतो? इतर ग्रहांवर का नाही? याचे कारण आहे कि आपल्या
सौरमालेतील सर्व ग्रहांपैकी फक्त पृथ्वीवरच राहण्यायोग्य पर्यावरण आहे.
सौरमाला काय आपल्या आजूबाजूच्या, आपल्या माहितीतील सर्व ग्रहांपैकी फक्त
पृथ्वीवरच असे पर्यावरण आहे. कित्येक वर्षे, अनेक शास्त्रज्ञ संशोधन करत
आहेत पण कोणीही आजतागायत असा ग्रह शोधू शकले नाही कि ज्यावर माणूस वस्ती
करू शकतो. खोलवर विचार करून बघा; आपल्याला एखादे घर नाही आवडले, किंवा तिथे
काही प्रोब्लेम्स असतील जसे कि पाणी पुरवठा होत नाही, वीज नाही तर आपण
दुसरे घर घेऊ शकतो पण आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने संपली किंवा
दुषित झाली तर आपण दुसऱ्या ग्रहावर राहायला जाऊ शकतो का? नाही ना. म्हणूनच
आपल्याला आपल्या पृथ्वीची काळजी घेतली पाहिजे. इथल्या पर्यावरणाला जपले
पाहिजे. नाहीतर आपला पुढच्या पिढीसाठी आपण खूप मोठी संकटे निर्माण करून ठेऊ
ज्यासाठी ती पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही.
No comments:
Post a Comment